वसमत बसस्थानक परिसरातील अतिक्रमणावर पोलिसांची कारवाई
रोज रात्री ७ ते १० नाकाबंदी;नशेत वाहन चालवणाऱ्यांवरही धडक कारवाई
वसमत / तालुका प्रतिनिधी
वसमत शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणाविरोधात वसमत शहर पोलिसांनी मंगळवार दि.८ एप्रिल रोजी विशेष मोहीम राबवली.
या मोहिमेअंतर्गत वसमत बसस्थानकाजवळील आशीर्वाद मेडिकल समोरील तसेच बसस्थानकासमोरील दोन्ही बाजूंच्या रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात आले.या कारवाईमुळे परिसरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली आहे.
या कारवाईवेळी पोलीस उप निरीक्षक कसबेवाड साहेब,महिला अधिकारी राखोडे मॅडम,संदिप जोंधळे,प्रशांत क्षीरसागर,नितीन रामदिनेवार,विवेक गुंडरे,संदिप करवंदे,तसेच पोलीस अधीक्षक हिंगोली कार्यालयाच्या आर.सी.पथकातील जवान आणि वसमत शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याशिवाय,शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी दररोज रात्री ७ ते १० या वेळेत शहरातील प्रमुख ठिकाणी नाकाबंदी करण्यात येत आहे.या नाकाबंदी दरम्यान नशेच्या अवस्थेत दुचाकी व चारचाकी वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
नागरिकांच्या अपेक्षे नुसार जर पोलीस प्रशासनाने व नगरपरिषदेने अशीच कारवाई मामा चौक ते झेंडा चौक (कपडा लाईन) रोड वरील अतिक्रमणावर केली तर शहरातील रहदारीचा बराचसा प्रश्न मिटेल.पोलीस प्रशासन व नगरपरिषदेच्या या भूमीकेकडे वसमत शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
वसमत शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.सुधीर वाघ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की,
“शहरातील वाहतूक,नागरिकांची सुरक्षितता आणि कायदा सुव्यवस्था लक्षात घेऊन अशा कारवाया सातत्याने सुरू राहणार आहेत.नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.”
वसमत बसस्थानक परिसरातील अतिक्रमणावर पोलिसांची कारवाई













Add Comment