Celebration • Health & Fitness • Maharashtra

देशमुख हॉस्पिटल वसमत तर्फे १ ऑक्टोबर रोजी मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबीर.

देशमुख हॉस्पिटल वसमत तर्फे १ ऑक्टोबर रोजी मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबीर.

प्रथम वर्धापन दिनानिमित्त विविध आजारांची तपासणी, नागरिकांनी लाभ घ्यावा डाॅ.अभिषेक देशमुख व डॉ.सुवासिनी देशमुख यांचे आवाहन.

दिशा न्युज मराठी २४×७

मुख्य संपादक -गिरीष देशमुख वसमत 

वसमत येथील देशमुख हॉस्पिटलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.येत्या दि.१ ऑक्टोबर २०२६ रोजी,गुरुवारी सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत गजानन महाराज मंदिर,बँक कॉलनी,वसमत येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

देशमुख हॉस्पिटलचे डॉ.अभिषेक देशमुख व डॉ.सुवासिनी देशमुख यांच्या पुढाकारातुन आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामध्ये नागरिकांना विविध प्राथमिक आरोग्य तपासण्या तसेच  आरोग्यविषयक मार्गदर्शन मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

शिबिरामध्ये बीपी तपासणी,रक्तातील साखरेची तपासणी,स्त्रीरोग तज्ज्ञांकडुन तपासणी व मार्गदर्शन,अस्थिरोग व फिजिओथेरपीसंदर्भात मार्गदर्शन,बालरोग तपासणी,त्वचारोगासंदर्भातील तपासणी तसेच हृदयविकारासंबंधी तपासणी व सल्ला आदी आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेक आजारांची सुरुवात प्राथमिक स्वरूपातील लक्षणांपासुन होते.मात्र,वेळेअभावी अनेक नागरिक नियमित आरोग्य तपासणी करून घेत नाहीत.त्यामुळे नागरिकांना त्यांच्या आरोग्याची प्राथमिक तपासणी करून घेता यावी आणि आवश्यकतेनुसार तज्ज्ञांचा सल्ला मिळावा,या उद्देशाने हे मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

देशमुख हॉस्पिटलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित या उपक्रमाचा परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक डॉ.अभिषेक देशमुख व डॉ.सुवासिनी देशमुख यांनी केले आहे.

शिबिराचे ठिकाण : गजानन महाराज मंदिर,बँक कॉलनी,वसमत

दिनांक : १ ऑक्टोबर २०२६,गुरुवार

वेळ : सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement