Editor Choice Good working Hingoli dist

हट्टा परिसरात चांगल्या पावसासाठी ग्रामदैवत श्री हट्केश्वर मंदिरात जलाभिषेक

हट्टा परिसरात चांगल्या पावसासाठी ग्रामदैवत श्री हट्केश्वर मंदिरात जलाभिषेक

दिशा न्युज मराठी २४×७,

मुख्य संपादक -गिरीष देशमुख वसमत 

वरुणराजाला भाविकांचे साकडे

यंदा अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिक चिंतेत आहेत.पावसाअभावी पिके करपण्याची भीती निर्माण झाली असुन, पाणीटंचाईचे संकट घोंगावु लागले आहे.या पार्श्वभुमीवर,परिसरात मुसळधार पाऊस व्हावा यासाठी हट्टा येथील ऐतिहासिक श्री हट्केश्वर मंदिरात महादेवाच्या पिंडीवर दि.२४ ऑगस्ट रोजी सकाळी जलाभिषेक करून पर्जन्यवृष्टीसाठी साकडे घालण्यात आले.

चालु हंगामात पावसाने ओढ दिल्याने परिसरातील पिकांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालल्याने समस्त गावकऱ्यांनी भगवान महादेवाला साकडे घालण्याचा निर्णय घेतला.या धार्मिक अनुष्ठानांतर्गत भाविकांनी हटकेश्वर मंदिरात एकत्र येत महादेवाच्या पिंडीवर विधिवत जलाभिषेक केला.तसेच वैदिक मंत्रोच्चारात विशेष पुजा-अर्चना करण्यात आली.

“परिसरात लवकरात लवकर समाधानकारक पाऊस पडु दे, बळीराजावरील संकट टळु दे आणि सर्वांच्या जीवनात सुख-समृद्धी येऊ दे,”अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.कमी पावसामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी ‘महादेवा,आता तुच कृपा कर’ अशी आर्त हाक याप्रसंगी दिली.

जलाभिषेकादरम्यान ‘हर हर महादेव,हट्केश्वर महाराज की जय,बम बम भोले’अशा जयघोषाने संपुर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला होता.या सामुहिक प्रार्थनेमुळे संपुर्ण परिसरात भक्तीमय आणि स्फूर्तीदायक वातावरण निर्माण झाले होते.निसर्गाची साथ लाभावी आणि पाणीसंकट दुर व्हावे,या भावनेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला हट्टा परिसरातील शिवभक्त,शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement