पंचायत समिती वसमत येथील सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील अंभोरे यांच्या दिव्यांगाची फेर तपासणी मुंबई येथून करण्याची आनंद खरे यांची मागणी.
सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील भानुदासराव अंभोरे हे पंचायत समिती वसमत येथे विस्तार अधिकारी सांखिकी या पदावर दिनांक ०६/०१/२००१ रोजी पासून कार्यरत आहेत,दिनांक १४/०२/१९९६ रोजी जिल्हा शैल्य चिकित्सक परभणी यांनी दिलेल्या वैद्यकीय दाखल्या नुसार ते परिशिष्ट”अ “अस्थीव्यंग दिव्यांग आहेत,
सध्या ते सहाय्यक गटविकास अधिकारी या पदावर कार्यरत असून मागील २५ वर्षांपासून ते एकाच ठिकाणी सेवेत कार्यरत असून त्यांनी दिव्यागांचे सर्व शासकीय सुविधांचा लाभ घेतला आहे,
१) दिनांक १४ फेब्रुवारी १९९६ रोजी सुनील भानुदासराव अंभोरे या नावाने ४५% दिव्यांग असल्या बाबतचे प्रमाणपत्र जिल्हा शैल्य चिकित्सक कार्यालय परभणी येथून प्राप्त केले आहे.
२) दिनांक २१/०५/२०१८ रोजी अंभोरे सुनील भागीरथाबाई भानुदासराव अंभोरे या नावाने ४५% कायमस्वरूपी दिव्यांग असल्या बाबतचे प्रमाणपत्र वैद्यकीय अधीक्षक वर्ग १ अस्थीव्यंग रुग्णालय परभणी येथून प्राप्त केले आहे.
३) दिनांक ०६/०४/२०२२ रोजी सुनील भानुदासराव अंभोरे या नावाने दिव्यांग प्रमाणपत्र वैद्यकीय अधीक्षक वर्ग १ अस्थीव्यंग रुग्णालय परभणी येथून प्राप्त केले असून नमूद दोन प्रमाणपत्रात आडनावत तफावत दिसून येत आहे,
सन ०६/०१/२००१ पासून वसमत पंचायत समिती येथेच सेवेत कार्यरत असून त्यांची १७ नोव्हेंबर २०२२ रोजी सहाय्यक गटविकास अधिकारी या पदावर पंचायत समिती वसमत येथेच त्यांना पदोन्नती दिली आहे,
ते कोणत्याच बाजूने दिव्यांग असल्याचे दिसून येत नाहीत परंतु त्यांनी प्राप्त केलेले दिव्यांग प्रमाणपत्र हे संशईत असल्याचे चित्र दिसून येत असून सदरील प्रमाणपत्र आर्थिक देवाण-घेवानीतून हातमीळवनी करून प्राप्त केले असल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील भानुदासराव आंभोरे हे दिव्यांग असल्या बाबत त्यांची वैद्यकीय फेर तपासणी के. ई.एम.किंवा जे.जे.रुग्णालय मुंबई येथे करावी तसेच दिव्यांगाचे प्रमाणपत्र वितरित व प्राप्त केल्या प्रकरणी उच्च स्तरीय समिती मार्फत चौकशी करावी व चौकशी अंती दोषीवर फौंजदारी कार्यवाही करून त्यांना नीलंबीत करण्यात यावे याबाबत आपल्या कार्यालयात दिनांक ०९/०२/२०२६ रोजी निवेदन सादर केले होते परंतु आजपर्यंत याबाबत कुठलीच कार्यवाही झाली नाही.
त्यामुळे सदरील प्रकरणी योग्य ती चौकशी करून संबंधितावर फौंजदारी व नीलबंनाची कार्यवाही करावी अशी मागणी मंत्रालय मुंबई येथे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव यांच्याकडे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद खरे यांनी
निवेदनाद्वारे केली आहे.













Add Comment