Editor Choice • Good working • Hingoli dist

शासकीय स्त्री रुग्णालय वसमतला जाणारा रस्ता होणार,जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचा ठाम निर्णय -प्रशांत लोखंडे थोरावेकर यांच्या आंदोलनाला मोठे यश

शासकीय स्त्री रुग्णालय वसमतला जाणारा रस्ता होणार,जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचा ठाम निर्णय -प्रशांत लोखंडे थोरावेकर यांच्या आंदोलनाला मोठे यश

घाण साचलेल्या पाण्यात दोन वेळा दिवसभर बसून केलेल्या पुस्तक आंदोलनाची प्रशासनाने घेतली दखल रुग्ण,डॉक्टर,कर्मचारी आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण

दिशा न्युज मराठी २४×७,

मुख्य संपादक -गिरीष देशमुख वसमत 

वसमत शहरालगत गणेशपुर रोडवर कोट्यवधी रुपये खर्चुन उभारण्यात आलेल्या भव्य शासकीय स्त्री रुग्णालयाकडे जाण्यासाठी अद्यापही व्यवस्थित रस्ता नसल्याचा गंभीर प्रश्न अखेर मार्गी लागण्याची चिन्हे दिसु लागली आहेत.’शासकीय स्त्री रुग्णालयाकडे जाणारा रस्ता होणारच,हे काम थांबवता येणार नाही!’अशा ठाम शब्दांत हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी महत्त्वाच्या बैठकीत भुमिका मांडल्याने रुग्णालयाच्या रस्त्याचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

विशेष म्हणजे,या रस्त्यासाठी प्रशांत लोखंडे थोरावेकर यांनी गतवर्षापासुन सातत्याने आंदोलने करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते.घाण साचलेल्या पाण्यात दिवसभर बसुन दोन वेळा केलेले पुस्तक आंदोलन,तसेच विविध आंदोलनांच्या माध्यमातुन त्यांनी रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर आणला होता.त्यांच्या सातत्यपुर्ण पाठपुराव्यामुळे या रस्त्याला प्रशासकीय मंजुरीही मिळाली होती.मात्र,दुष्काळी परिस्थिती आणि पाण्याअभावी रस्त्यांची कामे थांबविण्यात आल्याने हा महत्त्वाचा रस्ता रखडला होता.

मात्र,शासकीय स्त्री रुग्णालयाकडे जाणारा रस्ता हा केवळ विकासकामाचा विषय नसुन रुग्णांच्या आरोग्याशी आणि जीविताशी संबंधित अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे.गर्भवती महिला,प्रसुतीसाठी येणाऱ्या रुग्णांसह रुग्णवाहिका,डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांना ये-जा करताना होणारा त्रास लक्षात घेता या रस्त्याचे काम लवकरच सुरू होईल,असा ठाम विश्वास जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी व्यक्त केला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या या भुमिकेमुळे अनेक दिवसांपासुन प्रलंबित असलेल्या प्रश्नाला आता गती मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.दुसरीकडे,प्रशांत लोखंडे थोरावेकर यांच्या आंदोलनाला अखेर यश मिळाल्याची चर्चा परिसरात सुरू झाली असुन सोशल मीडियावरही त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

आंदोलनातुन प्रशासनाला जाग,आता प्रत्यक्ष कामाची प्रतीक्षा!

रस्ता मंजुर होऊनही काम सुरू होत नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला.अखेर जिल्हाधिकाऱ्यांनीच रस्ता होणार असल्याचे स्पष्ट केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी या प्रश्नाचे गांभीर्य ओळखुन घेतलेल्या ठाम भुमिकेबद्दल त्यांचेही आभार मानले जात आहेत.

आता आश्वासनाचे प्रत्यक्ष कामात रूपांतर कधी होते,याकडे संपुर्ण वसमतकरांचे लक्ष लागले आहे.कारण हा रस्ता कोणाच्या वैयक्तिक सोयीसाठी नसुन शासकीय स्त्री रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाच्या सुरक्षिततेसाठी आणि सुविधेसाठी अत्यावश्यक आहे.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement