Editor Choice • Hingoli dist • Maharashtra

दुष्काळी परिस्थिती आणि आगामी उन्हाळ्यातील पाणीटंचाईचे संकट लक्षात घेता वसमत नगर परिषदेच्या १० कोटींच्या रस्ते व नाली बांधकाम निविदांना स्थगिती द्या.

दुष्काळी परिस्थिती आणि आगामी उन्हाळ्यातील पाणीटंचाईचे संकट लक्षात घेता वसमत नगर परिषदेच्या १० कोटींच्या रस्ते व नाली बांधकाम निविदांना स्थगिती द्या.

पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य द्या,NSUI जिल्हाध्यक्ष अब्दुल राशीद अब्दुल हफीज यांची उपविभागीय अधिकाऱ्यांकडे मागणी

दिशा न्युज मराठी २४×७,

मुख्य संपादक – गिरीष देशमुख वसमत 

वसमत शहरासह परिसरात आगामी उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन वसमत नगर परिषदेने प्रसिद्ध केलेल्या अंदाजे ८ ते १० कोटी रुपयांच्या नवीन रस्ते व नाली बांधकामांच्या निविदांना तात्काळ स्थगिती देण्यात यावी,अशी मागणी NSUI चे हिंगोली जिल्हाध्यक्ष अब्दुल रशीद अब्दुल हफीज यांनी उपविभागीय अधिकारी,वसमत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

महाराष्ट्रात सध्या दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन शेतकरी,शेतमजुर आणि सर्वसामान्य नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागत आहे.ग्रामीण भागात पिण्याचे पाणी, शेतीसाठी पाणी तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.अशा परिस्थितीत वसमत नगर परिषदेकडून दि.१८ नोव्हेंबर २०२६ रोजी अंदाजे ८ ते १० कोटी रुपयांच्या नवीन रस्ते व नाली बांधकामांच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.मात्र,आगामी उन्हाळ्यात शहरात पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता असताना या कामांच्या प्राधान्यक्रमाबाबत फेरविचार होणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाने दुष्काळग्रस्त भागातील जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीच्या विनियोगाबाबत महत्त्वपुर्ण निर्णय घेतला आहे.तसेच मदत व पुनर्वसन विभागाच्या शासन निर्णयानुसार पिण्याच्या पाण्याची उपलब्धता वाढविणे,जलस्रोतांचे बळकटीकरण आणि पाणीटंचाई निवारणाच्या कामांना प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होणारे तसेच पाणीटंचाई निवारणासाठी अत्यावश्यक नसलेले सिमेंट-काँक्रिट रस्ते,नाली,गटारे आदी बांधकामांना आढावा घेऊन स्थगिती देण्याबाबतही निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे.

सिमेंट-काँक्रिट रस्ते व नाली बांधकामांसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते.सध्या शहरात पाण्याची टंचाई जाणवत असताना अशा कामांसाठी पाण्याचा वापर केल्यास आगामी उन्हाळ्यात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागु शकतो.त्यामुळे शहरातील पिण्याच्या पाण्याची सद्यस्थिती आणि आगामी उन्हाळ्यातील संभाव्य टंचाई लक्षात घेऊन नवीन रस्ते व नाली बांधकामांना पुढील पावसाळ्यापर्यंत स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली आहे.

      निवेदनातील प्रमुख मागण्या

वसमत नगर परिषदेने प्रसिद्ध केलेल्या अंदाजे ८ ते १० कोटी रुपयांच्या नवीन रस्ते व नाली बांधकामांच्या निविदांना तात्काळ स्थगिती द्यावी,दुष्काळ निवारणासाठी अत्यावश्यक नसलेली कामे शासन निर्णयानुसार रद्द करावीत,पाणीटंचाई लक्षात घेऊन नवीन बांधकामे पुढील पावसाळ्यापर्यंत स्थगित ठेवावीत,तसेच प्रस्तावित निधीचा वापर शहरातील पाणीपुरवठा योजना,जलस्रोतांचे बळकटीकरण,पाण्याच्या टाक्या,पाणीगळती रोखणे आणि पाणीपुरवठा व्यवस्था सक्षम करण्यासाठी करावा,अशा मागण्या निवेदनातुन करण्यात आल्या आहेत.

याशिवाय शासनाच्या दुष्काळविषयक आदेशांचे पालन होत आहे किंवा नाही,याची तपासणी करून संबंधित निविदांबाबत योग्य प्रशासकीय निर्णय घेण्याची मागणीही करण्यात आली आहे.

आगामी उन्हाळ्यात वसमत शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या संकटाला सामोरे जावे लागु नये,यासाठी प्रशासनाने वेळीच खबरदारी घेऊन पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे,अशी भुमिका NSUI जिल्हाध्यक्ष अब्दुल राशीद अब्दुल हफीज यांनी निवेदनातुन मांडली आहे.सदर निवेदनाच्या प्रती विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी हिंगोली,तहसीलदार वसमत आणि मुख्याधिकारी,नगर परिषद वसमत यांनाही देण्यात आल्या आहेत.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement