वसमतकरांनो नळाला येणारे पिण्याचे पाणी उकळुन प्या,नगराध्यक्षा सौ.सुनिताताई बाहेती यांचे नागरिकांना आवाहन
जलस्रोतांतील पाण्याची पातळी घटल्याने पाणी अधिक गढुळ
दिशा न्युज मराठी २४×७
मुख्य संपादक- गिरीष देशमुख वसमत
वसमत शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सिद्धेश्वर धरण व सती पांगरा तलाव या प्रमुख जलस्रोतांमधील पाण्याची पातळी खालावली असुन,पाण्याने तळ गाठल्याने उपलब्ध पाणी अधिक गढुळ होत आहे.त्यामुळे शहरातील नागरिकांनी नळाद्वारे येणारे पाणी उकळुनच प्यावे,असे आवाहन वसमत नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ. सुनीताताई बाहेती यांनी केले आहे.
सध्या सिद्धेश्वर धरण व सती पांगरा तलाव या जलस्रोतांमध्ये पाणीसाठा कमी झाल्यामुळे जलशुद्धीकरण केंद्रात तुलनेने अधिक गढुळ पाणी येत आहे.या परिस्थितीत नागरिकांना योग्य गुणवत्तेचा व सुरक्षित पाणीपुरवठा व्हावा,यासाठी नगर परिषद प्रशासनाकडुन आवश्यक उपाययोजना व जलशुद्धीकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
पाण्याची गुणवत्ता राखण्यासाठी नगर परिषद प्रशासन प्रयत्नशील असुन,नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी घेणे आवश्यक आहे.त्यामुळे नागरिकांनी नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा वापरण्यापुर्वी पाणी चांगले उकळुन घ्यावे आणि त्यानंतरच पिण्यासाठी वापरावे,असे आवाहन नगराध्यक्षांनी केले आहे.
शहरातील नागरिकांनी या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पाण्याचा जपुन वापर करावा.तसेच नगर परिषद प्रशासनाकडुन करण्यात येत असलेल्या उपाययोजनांना सहकार्य करावे,असेही नगराध्यक्षा सौ.सुनीताताई बाहेती यांनी स्पष्ट केले आहे.
जलस्रोतांमधील घटता पाणीसाठा आणि गढुळ पाण्याची समस्या लक्षात घेता नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत प्रशासनाने केलेल्या सुचनांचे पालन करावे,असे आवाहन नगर परिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.














Add Comment