Editor Choice • Maharashtra • Vasmat city

वसमत शहरातील सोमवार पेठ, हनुमान मंदिर येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरू

वसमत शहरातील सोमवार पेठ,हनुमान मंदिरात भक्तिमय वातावरणात अखंड हरिनाम सप्ताह सुरू 

ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प.शरदकाका आंबेकर यांच्या संगीत संत चरित्र कथेने भाविक मंत्रमुग्ध

दिशा न्युज मराठी २४×७

मुख्य संपादक – गिरीष देशमुख वसमत 

वसमत शहरातील सोमवार पेठ येथील श्री हनुमान मंदिरात दि.१५ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.या सप्ताहामध्ये श्रीमद् संगीत भागवत कथा, ज्ञानेश्वरी पारायण व संगीत संत चरित्र कथा अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कथेचे मुख्य यजमान श्री.चंद्रकांत जयराम गुडेवार व सौ.शुभांगी चंद्रकांत गुडेवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या धार्मिक सोहळ्यात ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प.शरदकाका अंबेकर यांच्या संगीत संत चरित्र कथेने उपस्थित भाविक भक्त,महिला भगिनी,भजनी मंडळे व भक्तगण मंत्रमुग्ध झाले. संतांच्या जीवनातील विचार,कार्य आणि भक्तिमार्गाचे महत्त्व संगीताच्या माध्यमातुन प्रभावीपणे मांडण्यात आले.त्यामुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.या संगीत संत चरित्र कथेला गायक शिवहार डांगे सर,गणेश जाधव,तबलावादक बाबुराव नंदनवनकर,अविनाश निंबाळकर,प्रल्हाद पटवे,मृदंगवादक विठ्ठल धम्मपल्लवार,नवनाथ कोरडे तसेच सिद्धवादक गजानन कोरडे यांनी तबला,हार्मोनियम व गायनाची सुरेल साथ दिली.संगीताच्या तालावर सादर झालेल्या संत चरित्र कथेला भाविकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.संगीत संत चरित्र कथा संपन्न झाल्यानंतर ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प.शरदकाका आंबेकर यांचा शाल व श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी श्याम देशपांडे,योगगुरू तुळशीराम ताटेवार सर,ह.भ.प.पुंजाप्पा महाराज साखरे,शिवहार डांगे सर,गुडेवार सर व भागानगरे यांची उपस्थिती होती.

या अखंड हरिनाम सप्ताहाच्या यशस्वी आयोजनासाठी सोमवार पेठ,रविवार पेठ,साखरे गल्ली,शहर पेठ आणि बगाडी मळा येथील मित्र मंडळांच्या व्यवस्थापकांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.अखंड हरिनाम सप्ताहामुळे सोमवार पेठेतील हनुमान मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला असुन,धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement