वसमत परिषदे तर्फे पाणी बचतीसाठी आवाहन एका बाजुला,तर दुसरीकडे हजारो लिटर पाणी नालीत !
नवीन पाईपलाईनच्या खोदकामामुळे वसमतकर त्रस्त,प्रभाग क्रमांक ४ मध्ये आठ दिवसांपासुन पाणीगळती,प्रभाग क्र.१४ गुलशन नगरमधील अरुंद रस्त्यांवर नागरिकांची कसरत
दिशा न्युज मराठी २४×७
मुख्य संपादक – गिरीष देशमुख वसमत
वसमत शहरात एकीकडे नगरपरिषद प्रशासनाकडुन नागरिकांना पाणी जपुन वापरण्याचे आवाहन केले जात असताना,दुसरीकडे शहरातील फुटलेल्या पाईपलाईनमधुन हजारो लिटर पाणी नालीत वाहून जात असल्याचे चित्र समोर आले आहे.शहरात पिण्याच्या पाण्यासाठी नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असुन,या कामासाठी अनेक ठिकाणी चांगले रस्ते खोदण्यात आले आहेत.मात्र,खोदकामानंतर रस्ते व्यवस्थित सपाट करून पुर्ववत करण्यात येत नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
नवीन पाईपलाईनच्या कामामुळे रस्त्यांची दुरवस्था
वसमत शहरात नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी विविध भागांमध्ये रस्त्यांचे खोदकाम सुरू आहे. पाईपलाईन टाकण्याचे काम नागरिकांच्या भविष्यातील पाणीपुरवठ्याच्या सुविधेसाठी महत्त्वाचे असले,तरी काम पुर्ण झाल्यानंतर खोदलेले रस्ते व्यवस्थित लेव्हल करून पुर्ववत करणे आवश्यक आहे.मात्र,अनेक ठिकाणी रस्त्यांवर मातीचे ढिगारे,खड्डे आणि उंचवटे कायम असल्याचे दिसुन येत आहे.
यामुळे दुचाकीस्वार,पादचारी, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यावरून ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.काही ठिकाणी खोदकामामुळे निर्माण झालेल्या असमान रस्त्यांवर नागरिक घसरून पडत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.पाईपलाईनचे काम नागरिकांच्या सोयीसाठी होत असताना,त्याच कामामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याची नाराजी व्यक्त होत आहे.
प्रभाग क्रमांक ४ मध्ये आठ दिवसांपासुन पाईपलाईन फुटली,पाणी नालीत
शहरातील शहर पेठ, प्रभाग क्रं.४ मध्ये नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असताना जुनी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटली आहे.मागील काही दिवसांपासुन या फुटलेल्या पाईपलाईनमधुन पाणी सतत वाहत असुन,हजारो लिटर पाणी नालीमध्ये वाया जात असल्याचे चित्र आहे.
एकीकडे शहरात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होत असताना, दुसरीकडे पिण्याचे पाणी अशा प्रकारे नालीत वाहुन जात आहे.मात्र,संबंधित यंत्रणेकडुन अद्याप तातडीने दुरुस्ती करण्यात आली नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.पाणीटंचाईच्या काळात पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असताना,अशा प्रकारच्या गळतीकडे दुर्लक्ष का केले जात आहे,असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
पाणी बचतीच्या आवाहनाला प्रशासनाच्या कारभारातुन विरोधाभास
वसमत नगरपरिषद प्रशासनाकडुन नागरिकांना पाणी जपुन वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे.पाणी बचतीबाबत जनजागृती केली जात असताना शहरातील पाईपलाईनमधुन मोठ्या प्रमाणावर पाणी नालीत वाहुन जात असल्याचे चित्र प्रशासनाच्या आवाहनाला विरोधाभास निर्माण करणारे आहे.
नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे,पाण्याचा अपव्यय करू नये, असे आवाहन करणाऱ्या प्रशासनाने शहरातील पाईपलाईन गळती रोखण्यासाठीही तितक्याच तत्परतेने उपाययोजना करणे अपेक्षित आहे.पाणी बचतीची सुरुवात प्रशासनाने स्वतःच्या यंत्रणेतील गळती थांबवुन करावी,अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.
प्रभाग क्र.१४ कारखाना रोडवरील गुलशन नगरमध्ये अरुंद रस्त्यांमुळे नागरिकांची कसरत
वसमत शहरातील कारखाना रोड परिसरातील गुलशन नगर येथेही नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे.गुलशन नगरमधील रस्ते आधीच अरुंद असल्याने पाईपलाईनच्या खोदकामामुळे नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
खोदकाम केलेले रस्ते व्यवस्थित लेव्हल करण्यात आले नसल्याने रस्त्यांवर माती,खड्डे व उंचवटे निर्माण झाले आहेत.या अरुंद रस्त्यांवरून विद्यार्थी,ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांना मार्गक्रमण करताना मोठी कसरत करावी लागत आहे.असमान रस्त्यांमुळे नागरिक घसरून पडण्याच्या घटना घडत असुन,अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. पाईपलाईनचे काम सुरू असताना नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य उपाययोजना करणे तसेच काम पुर्ण झाल्यानंतर रस्ते पूर्ववत करणे अत्यावश्यक आहे.
नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम पुर्ण झाल्यानंतर संबंधित कंत्राटदार व नगरपरिषद प्रशासनाने खोदलेले रस्ते व्यवस्थित सपाट करून पुर्ववत करावेत.रस्त्यांवरील खड्डे,उंचवटे आणि मातीचे ढिगारे तातडीने हटवुन नागरिकांना सुरक्षित वाहतुकीसाठी रस्ते उपलब्ध करून द्यावेत,अशी मागणी होत आहे.
तसेच प्रभाग क्रमांक ४ मधील फुटलेल्या पाईपलाईनची तातडीने दुरुस्ती करून पाण्याचा अपव्यय थांबवावा,गुलशन नगरसह शहरातील खोदकाम झालेल्या सर्व रस्त्यांची योग्य पद्धतीने दुरुस्ती करावी,अशी अपेक्षा नागरिकांकडुन व्यक्त केली जात आहे.
पाणी बचतीचे आवाहन करण्यापुर्वी शहरातील पाण्याची गळती थांबवणे आणि खोदकामामुळे निर्माण झालेल्या समस्यांचे निराकरण करणे गरजेचे आहे.वसमत नगरपरिषद प्रशासन नागरिकांच्या या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करणार का,असा सवाल आता वसमतकरांतुन उपस्थित केला जात आहे.














Add Comment