Celebration Education Vasmat city

वसमतच्या हु.बहिर्जी विद्यालयातील दोन विद्यार्थिनींना इंडियन टॅलेंट ओलंपियाडमध्ये सुवर्णपदक

हु.बहिर्जी विद्यालय वसमत येथील वैष्णवी शिंदे व गजश्री भोसले इंडियन टॅलेंट ओलंपियाडमध्ये सुवर्णपदकाच्या मानकरी

दिशा न्युज मराठी २४×७

मुख्य संपादक -गिरीष देशमुख 

वसमत येथील नामांकित हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालयाच्या विद्यार्थिनी कु.वैष्णवी माणिकराव शिंदे आणि कु.गजश्री किशन भोसले यांनी इंडियन टॅलेंट ओलंपियाड परीक्षेत गणित व विज्ञान विषयात राज्यस्तरावर उत्कृष्ट यश संपादन करत सुवर्णपदक पटकावले आहे.

या दोन्ही विद्यार्थिनींना सुवर्णपदक,प्रशस्तीपत्र तसेच प्रत्येकी ७०० रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करून गौरविण्यात आले.राज्यातील टॉपर विद्यार्थिनी म्हणुन त्यांच्या या यशामुळे विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

या यशामागे विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.जी.शेळके यांचे मार्गदर्शन व सहकार्य मोलाचे ठरले.त्यांच्या शैक्षणिक नेतृत्वाची दखल घेत इंडियन टॅलेंट ओलंपियाड (ITO) तर्फे त्यांना ‘बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला.

तसेच विद्यालयातील एम.व्ही.वाटोडे, एम.आर.कुकडे,के.जी. देशमुख,एस.एम.नादरे, एम.डी.लोहबंदे आणि ए.व्ही.कडतन या शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापुर्ण मार्गदर्शनाबद्दल ‘इन्स्पायर टीचर अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले.

या सर्व पुरस्कार विजेत्यांचा विद्यालयाचे मुख्याध्यापक

पी.जी.शेळके,उपमुख्याध्यापक जी.आर.आरकीलवाड,पर्यवेक्षिका एस.व्ही.जाधव तसेच पर्यवेक्षक डी.आर.बागल आणि के.बी.वायचाळ यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

विद्यार्थिनींच्या या उल्लेखनीय यशाबद्दल पालक,शिक्षक व परिसरातून त्यांचे अभिनंदन होत असून विद्यालयावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

About the author

मुख्य संपादक : श्री. गिरीश देशमुख

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement